सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन, सोलापूर महापालिका एन एच एम संघटना व सोलापूर महापालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समिती यांच्या वतीने बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कंत्राटी नर्सेस, शहरी ग्रामीण एएनएम / जीएनएम / एलएचव्ही / प्रयोगशाळा तंत्रज्ञ / औषध निर्माण अधिकारी / वैद्यकीय अधिकारी व एनयुएचएम अंतर्गत कार्यरत तसेच एनएचएम कंत्राटी कर्मचान्यांना रिक्त पदावर समायोजन करण्याबाबत
सेवेत कायम करणे व रिक्त पदावर समायोजन करणे अशी मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटना सोलापूर शाखेच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.
सुनिता पवार दि.३/११/२००३ रोजी नाशिक जिल्ह्यातील आरोग्य सेविकेचा जीव गेला त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून दहा लाखाची आर्थिक मदत तातडीने द्यावी अशी ही मागणी या आंदोलनातून करण्यात येत आहे.