सोलापुरात आला खेकडा, झणझणीत माशाचा रस्सा, खायची संधी सोडू नका ! गड्डा यात्रेच्या जवळच आहे स्पॉट
सोलापूर : गावरान पद्धतीने खेकडा आणि झणझणीत माशाचा रस्सा त्याचबरोबर चिकन मटन बिर्याणी खायला कुणाला आवडणार नाही. आता सोलापूरकर खवय्यांसाठी अगदी गड्डा यात्रेच्या समोरच ही मेजवानी उपलब्ध झाली आहे.
नेमके कुठे म्हणाल तर हे आहे रंगभवन चौकाकडून हरीभाई शाळेकडे येताना डाव्या बाजूला वोरोनोको प्राथमिक शाळेच्या मैदानावर.
सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या उमेद या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत यंदाचा रुक्मिणी महोत्सव तीन दिवसासाठी भरवण्यात आला आहे. दिनांक 21 ते 23 जानेवारी या तीन दिवसात हा महोत्सव या ठिकाणी भरला आहे.
या मिनी सरस व रुक्मिणी महोत्सवामध्ये पुणे व छत्रपती संभाजीनगर विभागातून ६० स्टॉल लावण्यात येणार आहेत.महिला बचत गटांना त्यांनी तयार केलेली उत्पादने विक्री करणे तसेच शहरी बाजारपेठ अनुभवण्याची संधी मिळते, या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचा परिचय शहरातील नागरिकांना होत असतो.या प्रदर्शनात मिलेट कुकीज, चटणी, लोकरीच्या वस्तू , भरतकाम केलेल्या साड्या, ज्यूटच्या वस्तू , लाकडी वस्तू, चामड्याच्या वस्तू , कृत्रिम दागिने, लेडीज बॅग, ड्रेस मटेरियल, साड्या, चादरी इ.वस्तू यांचा समावेश आहे.या वस्तू केवळ वैशिष्ट्यपूर्णच नाहीत तर उच्च दर्जाच्याही आहेत, ग्रामीण कारागिरांचे कौशल्य आणि कारागिरीचे प्रदर्शन करतात.शिवाय, घरगुती मसाले, पापड, कुरडई आणि इतर खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल असतील.हे स्टॉल अभ्यागतांना अस्सल ग्रामीण स्वादिष्ट पदार्थ चाखण्याची आणि खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.