“मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी” ; “आडम मास्तर भी सफलता के फल खाके भारी हुये है, ये भी मोदी की गॅरंटी”
सोलापूर : कुंभारी येथील रे नगर मधील 15000 घरांच्या हस्तांतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार मास्तर यांची उपस्थिती होती.
यावेळी प्राथमिक स्वरूपात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पाच लाभार्थ्यांना घराची चावी प्रदान करण्यात आली.
आपल्या भाषणात बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, 2019 यावेळी या घरांच्या पायाभरणी समारंभाला स्वतः आलो होतो आणि त्यावेळी मी शब्द दिला होता की, घरांच्या चाव्या द्यायला मी येणार, ती माझी गॅरंटी होती आणि आज या कार्यक्रमाला मीच उपस्थित आहे. त्यामुळे “मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी” असे म्हणताच उपस्थित यामध्ये एकच टाळ्यांचा कडकडाट झाला.
आज ही घर मी पाहिली, लहानपणी मलाही अशा घरांमध्ये राहता आले असते तर… असे म्हणून काही वेळ पंतप्रधान मोदी भावूक झाले होते.. येणाऱ्या 22 तारखेला आयोध्या मध्ये श्रीराम मंदिराचे लोकार्पण होणार आहे. त्या दिवशी प्रत्येकाने दिवा लावा, तो दिवा म्हणजे तुमची गरिबी दूर करणारा ठरेल असे सांगतानाच मोदी यांनी आपली नजर आडम मास्तर यांच्याकडे वळवली.
ते म्हणाले, 2019 वेळी मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा ते थोडेसे सडपातळ होते परंतु आता या पाच वर्षात त्यांचे वजन वाढले आहे, ते जाड झाले आहेत, “सफलता के फल खाके” हे सुद्धा मोदींच्या गॅरंटीमुळे झाले आहे ती गॅरंटी सफलताची गॅरंटी आहे असे सांगताच उपस्थितांमध्येही हशा पिकला.