Monday, August 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

लढवय्या कामगार नेता आडम मास्तरांचा इतिहास जाणून घ्यायचा आहे मग या गुरुवारी ; नार्थकोटवर प्रकाशन सोहळ्याची जय्यत तयारी !

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 May 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 




सोलापूर –  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वोच्च समितीचे सदस्य आणि महाराष्ट्र राज्य सचिव पद  यशस्वीपणे भूषविलेले माजी आमदार  कॉ.नरसय्या मास्तर यांनी आजमितीस कामगार चळवळ आणि पक्ष वाढीसाठी दिलेले योगदान हा सोलापूर च्या मागील सहा दशकांचा चालता बोलता इतिहास असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांनी अनेक लढे यशस्वी केले,  संघटीत-असंघटीत कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन सरकारची सरकारचे लक्ष वेधले, न्याय हक्काची लढाई व धनशक्ती विरुद्ध श्रमशक्ती मजबुत करण्यासाठी अव्याहतपणे परिश्रम घेत आहेत. ही बाब चळवळीत येणाऱ्या नवोदित कार्यकर्त्यांसाठी स्फूर्ती आहे. या स्फूर्तीदायी व्यक्तिमत्वाचा आत्मचरित्र प्रकाशन सोहळा 1 जुन रोजी नॉर्थकोट मैदान येथे संपन्न होणार आहे.तरी या सोहळ्याला समस्त सोलापूरकरांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव ऍड.एम.एच.शेख यांनी केले.


याची जय्यत तयारी करत असून शहरात ठिकठिकाणी लाल झेंडे, स्वागत कमानी, डिजीटल फलक लावण्यात येत आहेत. गेल्या महिनाभरापासून सोशल मीडियावर कॉ.आडम मास्तर यांनी आजवर केलेली आंदोलने, लढे, मोर्चा,कार्याची माहिती देणारे पोस्ट टाकण्याचे उपक्रम चालू आहे.यामध्ये फेसबुक, व्हाट्सएप,ट्विटर,इंस्टाग्राम हँडल चालवत आहेत.तसेच  प्रसार आणि प्रचारासाठी 1लाख पत्रके छपाई केली  असून त्याच्या वितरणासाठी संपूर्ण शहरात पक्षाच्या नेतृत्वाखाली गटसभा,कॉर्नर सभा, ऑटो रिक्षा प्रचार, निमंत्रण पत्रिका वितरित करण्यात येत आहेत. या सभेला किमान 50 हजार लोक येतील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातील कार्यकर्ते व नेतेगण ही या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येते.


तसेच या पत्रकार परिषदेत कॉ.आडम मास्तरांचा  जीवनप्रवास  सांगणारा घटनाक्रम  ही प्रसिद्धीस देण्यात आली. 


कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांचा सालानिहाय जीवनप्रवास घटनाक्रम 


१९४५ जन्म  


१९५० शाळेत दाखल 

घोंगडे वस्ती येथे माजी नगरसेवक जेनुरे यांच्या घराजवळ कैरमकोंडा यांच्या वाड्यात वास्तव्य  


१९५०-५४ १३ नंबर नगरपालिका शाळा येथे प्राथमिक शिक्षण १ ली ते ४ थी 

१९५५ घोंगडे वस्तीमधून गुरुवार पेठ मामड्याल वाडा येथे भाडेकरू म्हणून स्थलांतर 

१९५५ ते ५७ ६ नंबर शाळा भद्रावती पेठ, जोडबसवन्ना चौक येथे शिक्षण 

१९५७ स्वतंत्र सैनिक आशन्ना इराबत्ती अपक्ष उमेदवार यांच्या विधान सभेच्या निवडणूक प्रचारात देशभक्ती गीत गायन. 

१९५७ ते ५९ कुचन हायस्कूल ९ वी पर्यंत शिक्षण ९ वी ची परीक्षा दिली नाही. 

१९५९ ते ६१ कुटुंबाची भयंकर वाईट अवस्था, प्रचंड उपासमार, दारिद्र्य यामुळे मानसिक वैफल्यग्रस्त अवस्थेत गुजराण केली.  

१९६२ कॉ. व्यंकप्पा मडूर यांच्या विधानसभेच्या निवडणूकीतील विजयानंतर गुरुवार पेठ येथे जाहीर सत्कार. 

१९६३ लष्कर (सैन्य भरती) साठी प्रयत्न त्याकरिता प्रत्यक्ष शारीरिक  परीक्षेत उत्तीर्ण परंतु वैद्यकीय अहवालानुसार छातीवर पांढरा डाग असल्याने अपात्र ठरविण्यात आले. 

१९६४ ते ६६ सोलापुरात लाल निशाण पक्षाचे राजवाडा चौक येथील जाहीर सभे नंतर कॉ. टिळक यांच्याबरोबर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात कोतवालांची संघटना बांधणीसाठी योगदान. 

१९६६ सोलापूर शहरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना 

कॉ. एस.वाय. कोल्हटकर, कॉ. एम.के.पंधे हे पुढारी आंध्रप्रदेश येथील तेनाली जिल्ह्यातून मुंबईकडे जात असताना सोलापूर येथे दोन दिवस मुक्काम 

या दरम्यान कॉ. नबीखान बेरिया, रमणय्या दिड्डी, कॉ. नारायणराव आडम यांनी विजापूर वेस येथे जाहीर सभेचे आयोजन केले. 

१९६७ स्वातंत्र्य सैनिक माजी आमदार श्री. शंकरप्पा धनशेट्टी यांच्याबरोबर काम केले. तसेच आमदार वि.रा.पाटील यांच्यासोबत काम करताना संपूर्ण महाराष्ट्र समिती आंदोलनात, जाहीर सभेत सक्रीय सहभाग. 

१९६७-६८ उदरनिर्वाहासाठी वेगवेगळ्या संस्थेत खाजगी नोकरी, वाचनालयात बुक बायडिंग, मोहरम सणानिमित्त वाघ रंगवणे, दिवाळी सणाला फटाके विक्री, उन्हाळ्यात गोळ्या बिस्कीट विकणे, भिंती रंगवणे, उन्हाळ्यात पतंग विक्री करणे असे अंग मेहनतीचे काम केले. त्यानंतर प्रसाद विणकर सोसायटीमध्ये सचिव म्हणून नोकरी केली. परंतु त्या ठिकाणी बोगस रिबेट प्रकरणाविरुद्ध उठाव केल्यामुळे राजीनामा द्यावा लागला. 

१९६८ साली पक्षाचे राज्याचे मध्यवर्ती कार्यालय वरळी येथील जनशक्ती येथे कॉ. बी.टी.रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे राज्यस्तरीय आठ दिवसाचे अभ्यास शिबीर पार पडले. या अभ्यास शिबिरात मार्क्सवाद, लेनिनवाद, कामगार चळवळशी निगडीत चर्चा व प्रश्नोत्तरे झाली. हे अविस्मरणीय अभ्यास शिबिर होते.  

१९६८-६९ बैलगाडी चालकांचा जिल्हाधिकारी कार्यलयावर अभूतपूर्व मोर्चा, रेडीमेड कामगारांचा सारडा पारेकर कारखान्यातील संप. 

सोलापूर महानगरपालिकेची पहिली निवडणूक लढवली व थोडक्यात पराभव झाला. 

बापुजी नगर परिसरात राहणाऱ्या मागासवर्गीय नागरिकांसाठी निर्माण केलेल्या घरकुलांमध्ये झोपडपट्टी वासियांना घेऊन टाळे तोडून कब्जा घेतले.  


१९७० हनुमान टेक्सस्टाईल चा लढा 

१९७२ सोलापूर शहर उत्तर विधान सभा मतदार संघातून निवडणूक लढवले व पराभव झाला. 

यंत्रमाग कामगारांचा किमान वेतनासाठी अभूतपूर्व लढाई ९ सप्टेंबर १९७२ रोजी तुरुंगात रवानगी व तुरुंगातच संपाचा करार. १० सप्टेंबर रोजी विजयी सभा. या सभेत पहिल्यांदा यंत्रमाग कामगारांकडून कन्ना चौक येथे नोटांचा हार घालून सत्कार. 

१९७३-७४ येरवडा तुरुंगात स्थानबद्ध (दोनवेळा) ८ महिने तुरुंगवास 

रिक्षा चालकांचा जिल्हा न्यायालयावर अभूतपूर्व मोर्चा. 

१९७५ दत्त नगर येथून पहिल्यांदा सोलापूर मनपा निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी 

तत्कालीन कॉंग्रेसचे पुढारी व कारखानदार यांच्यामार्फत जीवघेणा हल्ला. 

१९७८ सोलापूर शहर उत्तर मतदार संघातून माकपाचे अधिकृत उमेदवार व जनता पक्षाच्या पाठींब्यावर ऐतिहासिक विजयी होऊन पहिल्यांदा आमदार 

वाडिया हॉस्पिटल येथे परिचारकांचा बेमुदत संप व विजय

या संपानंतर शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यास आलेल्या हल्लेखोरांना कामिनी डोंगरे यांनी स्वतः झेलत परतून लावले. 

मुंबई प्रमाणे गिरणी कामगारांना ४५ रुपये महागाई भत्ता मिळावे यासाठीचा लढा. 

रंगणी कामगारांचा लढा व या दरम्यान उस्मानाबाद तुरुंगात रवानगी 

१९७९ कामिनी डोंगरे यांच्याशी विवाह 

१९८० विधानसभेत पराभव (पक्षातून बाहेर) 

१९८१ यंत्रमाग कामगारांचा प्रसिद्ध वेस्ट कॉटनचा लढा 

यावेळीहि जीवघेणी हल्ला 

१९८२ कामगार नेते दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे गिरणी कामगारांच्या ऐतिहासिक लढ्यात सहभाग 

१९८३ सोलापुरात दत्ता सामंत, कॉ. कुरणे, कॉ. चिटणीस, कॉ. संतराम पाटील, कॉ. कुलकर्णी इत्यादी नेत्यांचा चार हुतात्मा पुतळा येथे जाहीर सभा. 

१९८४ पक्षात पुनरागमन 

यंत्रमाग कामगारांचा ५४ दिवसांचा अभूतपूर्व बेमुदत संप. २५ हजार कामगार सहभागी. 

शहर दक्षिण मधून CPI व CPM पुरस्कृत विधान सभा उमेदवार पराभव 

१९८५-८९ १९८५ सालच्या दत्त नगर येथून महापालिका निवडणुकीत दुसऱ्यांदा नगरसेवक

१९९० चीनचा अभ्यास दौरा 

१९९१ जागतिकीकरण, उदरीकरण, खाजगीकरण विरुद्ध सतत संघर्ष 

१९९२ १९९२ मध्ये बापुजी नगर मधून महापालिका निवडणुकीत तिसऱ्यांदा नगरसेवक

६ डिसेंबर १९९२ साली बाबरी मशीद शहीद, ७ डिसेंबर लक्षवेधी मूकमोर्चा व येरवडा तुरुंगात रवानगी. 

१९९३-९४ १९९३ पासून कॉ. गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून घरकुलांसाठी आंदोलन. 

१९९५ १९९५ साली शहर दक्षिण मधून विधान सभा निवडणुकीत दुसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी. 

कांही विरोधकांच्या मार्फत १९९५ च्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान शास्त्री नगर येथे प्राणघातक हल्ला. 

१९९९ १९९९ साली गोदुताई घरकुलाचे काम प्रस्तावित राहिल्याने विधानसभा निवडणुकीत पराभव.

२००० ८ मार्च २००० साली तत्कालीन पंतप्रधन अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून गोदुताईच्या १० हजार घरकुलाना मान्यता. २००४ पर्यंत उभारणी. 

२००४  धुम्रपान कायद्याच्या विरोधात कुचन प्रशालेच्या मैदानात २६ जुलै २००४ रोजी ५० हजार विडी कामगारांची जाहीर सभा. तद्नंतर कॉ. सीताराम येचुरी यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन. 

२००४ २००४ साली शहर दक्षिण विधानसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा विजयी. 

पद्मशाली विद्यार्थ्यांना एसबीसी वर्गातून महाराष्ट्रात १५० कोटी रुपयांची शिष्यवृत्ती देण्यास सरकारला भाग पाडले. 

वडार समाजाच्या दगडखाणी बंद बाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट असताना वडार समाजाच्या खाणी चालू करण्यास महाराष्ट्र शासनाला भाग पाडले. 

१५ हजार विडी कामगारांना पिवळे शिधापत्रिका मिळवून दिली.

आव्हाडे समिती माध्यमातून यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याची शिफारस व तत्वता मान्यता. 

२००६ तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते कॉ.गोदुताई परुळेकर घरकुलांच्या हस्तांतरण. 

२००९ सोलापूर शहर मध्य या नव्या विधानसभा मतदार संघाची निर्मिती केल्यामुळे हक्काचे व पारंपरिक मतदार इतर मतदार संघामध्ये विभागल्यामुळे पराभव. 

३० हजार असंघटीत कामगारांच्या रे नगर गृहनिर्माण प्रकल्पाची उभारणी. 

२०१४ रे नगर प्रकल्प प्रस्तावित असल्यामुळे विरोधकांचा अपप्रचार व प्रकल्पात अडचणी यामुळे पराभव. 

२०१९ रे नगर प्रकल्प प्रस्तावित असल्यामुळे विरोधकांचा अपप्रचार व प्रकल्पात अडचणी यामुळे पराभव. 

१९ जानेवारी २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते रे नगर गृहनिर्माण प्रकल्पाची पायाभरणी. 

२०२०-२१ कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या कालावधीत पूर्णतः जनतेत सक्रीय सहभाग. जनतेला सरकारी मदत व पक्षाकडून अन्नधान्य, औषधे वाटप. अनेकांचे जीव वाचविण्यात यश. 

२९ एप्रिल २०२१ रोजी आकस्मित गंभीर ह्दय विकाराचा झटकेचा आघात व त्यातून सुखरूप परतले. 


या पत्रकार परिषदेस माकपचे जिल्हा सचिव अँड.एम.एच.शेख, जिल्हा सचिव मंडळ सदस्य कुरमय्या म्हेत्रे, सिद्धप्पा कलशेट्टी, नसीमा शेख, प्रा.अब्राहम कुमार, सुनंदा बल्ला, अँड.अनिल वासम आदी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरात वादळी वाऱ्याने चक्क मोबाईल टॉवर उखडून पडला ; अनेक घरांचे नुकसान ; आमदार प्रणिती शिंदे यांनी केली पाहणी

Next Post

वीस हजाराची लाच घेणारी महिला मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

वीस हजाराची लाच घेणारी महिला मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ताज्या बातम्या

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026

क्राईम

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996367
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group