Tuesday, June 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आमदार समाधान आवताडे यांनी करून दाखवले ! मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांची मान्यता

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 January 2024
in political
0
आमदार समाधान आवताडे यांनी करून दाखवले ! मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांची मान्यता
0
SHARES
208
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील 24 गावच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार असून सर्वच पक्षाचा राजकीय अजेंडा बनलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मान्यता दिली असून काही विभागाच्या परवानग्या घेऊन लवकरच हा प्रस्ताव कॅबिनेटसमोर जाईल व निधी मंजूर होऊन निविदा प्रक्रिया पार पडेल अशी माहिती आ समाधान आवताडे यांनी दिली.

ते पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांनी प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला होता त्या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली असून या प्रस्तावामध्ये भीमा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून ९५ किलोमीटर मधून पोहोच कालव्याद्वारे योजनेसाठी आवश्यक २.०४ अघफु(५७.७६४ दलघमी) पाणी उचलून बंदिस्त नलिका प्रणाली द्वारे मंगळवेढा उपसा सिंचन योजनेतील २४ गावातील १७१८६ हेक्टर दुष्काळी क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी वापरण्यात येणार आहे अशा या प्रस्तावास शासन निर्णय २३ नोव्हेंबर २०१६ मधील निर्देशांकाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिली असून लवकरच ही योजना मार्गी लागणार असल्याचे आमदार अवताडे यांनी सांगितले.

गेली अनेक वर्षे दुष्काळाच्या खाईत लोटलेल्या मंगळवेढा तालुक्यातील जनतेची पाणी प्रश्नावर असणारी तळमळ लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचा पाणीप्रश्न वेळोवेळी शासन दरबारी लावून धरला आहे. सदर योजनेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा व ही योजना लवकरात- लवकर मार्गी लागावी यासाठी वारंवार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा व प्रत्यक्ष पत्र व्यवहार केला होता.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांच्या झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी आ आवताडे यांच्या प्रचार सभेत बोलताना सांगितले होते की, या मतदारसंघांमध्ये तुम्ही आमदार आवताडे यांना विजयी करुन त्यांच्या रूपाने भारतीय जनता पार्टीला आणखी एक लोकप्रतिनिधी द्या व त्यानंतर मंगळवेढा उपसा सिंचन योजना कार्यान्वित होण्यासाठी मी स्वतः राज्यातून नाही मिळाला तर केंद्रातून निधी आणेन पण ही योजना पूर्ण करेन असा शब्द दिला होता.

नंतरच्या काळात राज्यात सत्ता परिवर्तन झाले आणि ना. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर ना.देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री झाले.त्यामुळे योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या तांत्रिक मंजुरीची चक्रे गतिमान झाली स्वतः फाइल घेऊन प्रत्येक टेबलावर जाऊन अडचणी सोडवित ना.फडणवीस यांच्या माध्यमातून मोठे यश मिळताना दिसत असून येत्या काही दिवसात या योजनेस प्रशासकीय मंजूरी व निधी मिळून त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात कामास सुरुवात होणार असल्याचे आ आवताडे यांनी सांगितले आहे.

Tags: Devendra fadnvisMangalwedhaMLA samadhan awtade
SendShareTweetSend
Previous Post

काँग्रेसच्या प्रकाश यलगुलवारांवर अमृत महोत्सवी वाढदिनी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव ; साहेबांच्या उपस्थितीने सर भारावले !

Next Post

Breaking ! पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी सोलापुरात ; गृहनिर्माण मंत्रालयाचे अवर सचिवांकडून अधिकृत माहिती

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1982055
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group