तक्रारदार यांचे वडील मयत झाल्याने त्यांच्या नावावर असलेल्या जागेवर तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांची वारस नोंद करण्यासाठी नगर भूमापन कार्यालय सोलापूर येथे अर्ज केल्यानंतर तक्रारदार यास खाजगी इसम व सदर कार्यालयात एजंट म्हणून काम करणारा व्यक्ती म्हणून अब्दुल रऊफ मोहम्मद शरीफ शेख वय- 58 रा. न्यू पाचा पेठ, सोलापूर यांनी तक्रारदाराचे काम करून देतो म्हणून रक्कम रुपये ३ हजाराची मागणी केली होती व सदर रक्कम स्वीकारत असताना दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी सदर खाजगी इसमास लाच स्वीकारत असताना अटक केली होती.
सदर खाजगी इसम अब्दुल रौफ मोहम्मद शरीफ शेख यांच्या वतीने अँड रियाज एन शेख यांनी सोलापूर येथील विशेष सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांच्या कोर्टामध्ये जामीन अर्ज सादर केला होता. सदर आरोपी यास खोट्या गुन्ह्यात गुंतवण्यात आलेले असून आरोपीने कोणत्याही प्रकारे लाच मागितलेली नाही. सदर आरोपीकडे पोलिसांनी पूर्णपणे चौकशी केली असून त्याची पुढील तपास कामी आवश्यकता नाही तसेच आरोपीच्या ताब्यातून काहीही जप्त करण्यात आलेले नसून आरोपी हा सोलापूरचा रहिवासी असून कुटुंबातील करता व्यक्ती आहे. जामीन मंजूर केल्यास तो कोठेही पळून जाणार नाही व तपास कामी सहकार्य करण्यास तयार आहे असा युक्तिवाद केला होता.
सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील लाच लुचपत कायद्याचे विशेष सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी खाजगी इसम नामे अब्दुल रौफ मोहम्मद शरीफ शेख यास रक्कम रुपये 25000/- वर जामीन मंजूर केला तसेच साक्षीदार वर कोणत्याही प्रकारे दबाव न आणण्याच्या व तपास कामी सहकार्य करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एडवोकेट कुलकर्णी यांनी तर आरोपी इसम तर्फे एडवोकेट अँड. रियाज एन शेख यांनी काम पाहिले.