सोलापूर : सोलापुरात सर्वच राजकीय पक्षांमध्ये काँग्रेस पक्षाचे स्वतःचे प्रशस्त असे कार्यालय आहे. त्याला काँग्रेस भवन म्हणून संबोधतात. सर्वच माध्यमांसाठी अतिशय सोयीचे असलेले कार्यालय असून काँग्रेसचे बऱ्यापैकी राजकीय नेते याच भवनांमध्ये भेटायला मिळतात.
मागील काही दिवसांपूर्वी या कार्यालयाचे चित्र

या डिजिटल मुळे काँग्रेस भवन काहीसे दिसेनासे असे चित्र पाहायला मिळत होते. परंतु सध्या या भवनाचे चित्र पाहिले असता डिजिटल मुक्त असे कार्यालय झाले असून या कार्यालयाने मोकळा श्वास घेतल्याचे दिसत आहे.
काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सर्वच डिजिटल काढून एकाच डिजिटलच्या छताखाली सर्व पदाधिकाऱ्यांना आणल्याचे पाहायला मिळते. दर्शनी भागात गेटवर कायमस्वरूपी डिजिटल फलक लावण्यात आले आहे. त्यावर शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष युवक अध्यक्ष, सेवादल ब्रिगेड अध्यक्ष, महिला विभाग, अनुसूचित जाती जमाती सेल, अल्पसंख्यांक सेल, एन एस यू आय, मीडिया सेल, सेवा दल सेल तसेच प्रवक्ता सेल यांच्या अध्यक्षांना स्थान देण्यात आले आहे. हे आगळे डिजिटल सध्या जाणाऱ्या येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.