सोलापूर : संसदेत जनतेच्या मूलभूत प्रश्नांविषयी आवाज ठेवणारे या गाडीचा 141 खासदारांना निलंबित केल्याप्रकरणी सोलापुरात इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी एकत्र येऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने आंदोलन केले.
आडम मास्तर यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली.
ते म्हणाले, नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या निवडणुकीच्या मतदानावर प्रकाश टाकला. यादीमध्ये काँग्रेस स्वतंत्र लढले पण काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या मतांची आकडेवारी पाहिली तर माझ्यापेक्षा नऊ लाख मते जास्त मिळाली. त्यामुळे काँग्रेस पक्षाने मोठ्या भावाची भूमिका बजवावी. प्रत्येक निवडणुकीत छोट्या पक्षांना सोबत घ्यावे तरच लोकसभेचे चित्र वेगळ दिसेल अन्यथा सर्वांना तुरुंगात जावे लागेल अशी भूमिका मांडली.
आमदार प्रणिती शिंदे या काँग्रेस कडून लोकसभा निवडणूक लढविणार आहेत, त्या खासदार झाल्या तर निश्चित शहर मध्य हा मतदारसंघ रिकामा होईल, त्यावर आघाडी मधून आडम मास्तर हे आपला दावा करू शकतात.