सोलापुरात कृषी विभागाची बुलेट रॅली ; तृणधान्याची जनजागृती ; पौष्टिक अन्न खाण्याचा संदेश
सोलापूर : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 जनजागृतीसाठी शहरांमध्ये बाईक रॅली काढण्यात आली.
छत्रपती संभाजी महाराज चौकातून या बाईक रॅलीचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, पोलीस सहाय्यक आयुक्त संतोष गायकवाड, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त जिंतुरकर, आहार तज्ञ डॉक्टर ज्योती पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला.
छत्रपती संभाजी महाराज चौकातून निघालेली ही रॅली होम मैदानावर येऊन विसर्जित झाली. यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना कृषी अधीक्षक मोरे, तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ, तालुका कृषी अधिकारी माळी यांनी पौष्टिक तृणधान्याचे आरोग्याच्या दृष्टिने महत्व विषद करून पौष्टिक तृणधान्याचा आहारात जास्तीत जास्त समावेश करावा असे आवाहन केले.