पुणे–राज्यातील जिल्हा परिषद सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांची सहविचार सभा पुणे येथील शिक्षक भवनात पार पाडली. या सभेत 8 सेवानिवृत्त शिक्षकाचे राज्य कार्यकारी मंडळ निवडण्यात आली आहे.
अध्यक्ष म्हणून सोलापूरचे शिवानंद भरले, सरचिटणीस हिगोलीचे राजकुमार वर्हाडे, कार्याध्यक्ष पालघरचे गोपाल आघीवाले, कोषाध्यक्ष सातारचे तुकाराम कदम, उपाध्यक्ष सिधुदूर्गचे हरिभाऊ निसरड, सल्लागार नवीमुबंईचे प्रभाकर डहाके, महीला प्रतीनीधी म्हणून अहमदनगरचे हसिना मुलाणी, सोलापूरचे प्रिया सहस्त्रबुध्दे, खाजगी शिक्षक प्रतीनीधी म्हणून मल्लीकार्जून पाटील आदींची एक मतानी आगामी 5 वर्षासाठी निवडण्यात आली आहे.
राज्य स्तरावरून उर्वारीत जिल्ह्यातील सेवानिवृत्ताना प्रतिनीधी देण्याचे अधीकार कार्यकारी मंडळाला देण्यात आले. सर्वसाधारण सभा जेष्ट नेते किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तर सिध्देश्वर पुस्तके सातारा, विठ्ठल पवार हिगोली यांच्या प्रमूख उपस्थितीत संपन्न झाली. सभेला 28 जिल्ह्यातील प्रतिनीधी उपस्थित होते.