नागपूर व औरंगाबाद इथून हज कमिटी महाराष्ट्र राज्यातून जाणारे हाजी यांना मुंबईपेक्षा अंदाजे 40 ते 50 हजार रुपये जास्त रक्कम द्यावी लागत आहे. हा डिफरन्स कमी करण्याकरिता लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात बैठकीसाठी वेळ घेऊन महायुतीचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाद्वारे डिफरन्स कमी करण्याची मागणी करणार असल्याचे प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण यांनी सांगितले आहे.
गुरुवार 14 डिसेंबर रोजी नागपूर हज कमिटी कार्यालयात महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे चेअरमन असिफ उस्मान खान व महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण व इतर अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीमध्ये वरील विषय चर्चा करण्यात आली. तसेच 2024 हज कमिटी ऑनलाइन फॉर्म भरण्याची मुदत वाढवावी अशी मागणी देखील बुऱ्हान यांनी सदर बैठकी मध्ये केली आहे.