सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे तब्बल दीड महिन्याच्या नंतर सोलापूर शहर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी ते दोन ठिकाणी जाऊन करणार आहेत. त्याचबरोबर जिल्हा वार्षिक योजनेच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या पिकांची आढावा बैठक तसेच टंचाई बैठक ते घेणार आहेत.
दरम्यान सोलापूरला मंजूर करण्यात आलेले श्री अन्न उत्कृष्टता केंद्र हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीला नेल्याने मागील काही दिवसात राजकीय वातावरण तापले होते. त्या पार्श्वभूमीवर आता पालकमंत्री सोलापुरात येणार आहेत. यावेळी निश्चितच सोलापूरची मीडिया या प्रश्न त्यांच्यावर तुटून पडेल अशी अपेक्षा आहे.