राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद या शहराचे नामकरण संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला मात्र या निर्णयाला काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोध दर्शवला आहे त्यावरून आता महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमेकावर नाराजीचा सूर उमटू लागला आहे या पार्श्वभूमीवर मराठा संघटना आता राज्यामध्ये आक्रमक झाल्या आहेत सोलापुरात संभाजी आरमार या संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झाले पाहिजे अशी घोषणाबाजी केली. दरम्यान संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी या प्रकरणी आपली भूमिका व्यक्त करताना हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याचा मनोदय यापूर्वी व्यक्त केला होता आता त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याने मोठी संधी आहे मात्र त्यांना काँग्रेसने विरोध केला आहे काँग्रेसला एवढे प्रेम असेल तर आपल्या अपत्यांची नावे औरंगजेब ठेवावी अशी टीका डांगे यांनी केली.या आंदोलनात कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे जिल्हाप्रमुख गजानन जगदाडे शहरप्रमुख शशिकांत शिंदे अमर गुंड, अनंतराव नीळ सुधाकर करणकोट यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.