सोलापूर शहर व जिल्ह्यात ही लस प्रथम शासकीय आणि खासगी आरोग्य कर्मचारी, अधिकारी अशा 30 हजार जणांना देण्यात येणार आहे. ड्राय रनची तयारी पूर्ण झाली असून तिन्ही ठिकाणी 75 जणांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लसीकरण मतदान प्रक्रियेसारखे असेल. लसाकरण करणाऱ्या व्यक्तींना ऑनलाईनद्वारे प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिह्यात शासकीय आणि खाजगी 599 लसीकरण करणाऱ्या व्यक्ती असतील. लसीकरण बुथवर एकच व्यक्ती लसीकरण रूममध्ये असेल. त्याच्याजवळील ओळखपत्र पाहून त्याची पडताळणी केली जाणार आहे. लसीकरण बुथवर पाच व्यक्ती असतील. सुरक्षा रक्षक लस घेणाऱ्याला तपासून आत सोडेल. ओळखपत्र तपासून समुदाय आरोग्य अधिकारी त्या व्यक्तीला लसीकरण करण्याची प्रक्रिया सांगेल. लसीकरण करणारी त्या व्यक्तीला लस देईल. याची नोंद ऑनलाईन कोविड पोर्टलवर होईल. लसीकरणानंतर निरीक्षण रूममध्ये अर्धा तास ती व्यक्ती थांबेल. या काळात निरीक्षक हे त्या व्यक्तीला काही बाधा होऊ नये, यासाठी नजर ठेवून असतील, सोलापूर शहरात गांधी नगर परिसरातील दाराशा दवाखाना, ग्रामीण भागात होटगी पीएचसी, अकलूज उपजिल्हा व बार्शी ग्रामीण रुग्णालयात चार ठिकाणी शुक्रवारी ड्राय रन घेतला जाणार आहे दरम्यान महापालिका उपायुक्त धनराज पांडे आणि जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव यांनी अधिक माहिती दिली.भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन आणि सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लसीला मान्यता मिळाली असून या लसी देण्यात येणार आहेत. शहर व जिल्ह्यात शासकीय आणि खाजगी असे 1710 आरोग्य संस्था आहेत. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, जिल्हा रूग्णालये, अंगणवाडी कर्मचारी, खाजगी दवाखान्यांचा समावेश आहे.