गुरुवार दिनांक 7 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे सिटू चे राज्यसचिव युसूफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सिटू च्या वतीने देशव्यापी निदर्शनाची हाक देण्यात आली.त्या अनुषंगाने सोलापूरात निदर्शने करण्यात आले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात जे तीन काळे कायदे पारित केले त्याच्या निषेधार्थ घोषणा देताना पोलिसांनी बळाचा वापर करून सिटू च्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक केले.यावेळी अनिल वासम, विक्रम कलबुर्गी, विजय हरसुरे,नलिनीताई कलबुर्गी, नसीमा शेख, शेवंता देशमुख, शकुंतला पानिभाते, युसूफ शेख मेजर, युसूफ रजाक शेख, दाऊद शेख, जावेद सगरी,जुबेर सगरी, श्रीनिवास गड्डम, अशोक बल्ला,हसन शेख,वीरेंद्र पद्मा, विल्यम ससाणे, वसीम मुल्ला, चण्णाम्मा भंडारे,व्यंकटेश कोंगारी,किशोर मेहता,अकिल शेख, आसिफ पठाण,दत्ता चव्हाण आदींसह 26 कार्यकर्त्यांवर सदर बझार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.