भंडारा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका श्रीदेवी फुलारे डफरीन हॉस्पिटल ची पाहणी केल्यावर अनेक समस्या निदर्शनास आल्या. भंडाराजिल्ह्यातील अग्नीतांडवात दहा निष्पाप लहान बाळांच्या जीवांचा बळी गेला या पार्श्व भूमीवर नगरसेविका श्रीदेवीताई फुलारे यांनी सोमवारी अचानक डफरीन हॉस्पिटल येथे व्हिजीट केली येथे असलेल्या साधन सामुग्री याची तेथील संबंधित अधिकारी व डॉक्टर स्टाफ यांना विचारणा केली व येथील ऑपरेशन थिएटर येथील लाईट फोकसचे व डिलेव्हरी वार्ड मधील पण वायरिंग खराब असलेल्या निदर्शनास आले व डफरीन हॉस्पिटल मध्ये आग विझवायचे यंत्र उपलब्ध नाही तसेच डिलेव्हरी साठी आलेल्या महिलांनाच्या अनेक समस्या या निदर्शनास आल्या .या संदर्भात संबंधित विद्युत विभागाचे अधिकारी व अग्निशमक दलाचे प्रमुख अधिकारी यांना कॉल करून बोलवून घेऊन त्यांना परिस्थिती दाखवली , नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांनी डफरीन हॉस्पिटल मधील वायरिंग व आग विझवायचे यंत्र बसवण्याविषयी सोलापूर महानगर पालिकेचे आयुक्त यांना पत्र दिले व काम लवकरात लवकर न झाल्यास आंदोलनचा इशारा दिलाय.