महाराष्ट्रासह देशभरात कोरोना नंतर बर्ड फ्लू या रोगाने थैमान घातले आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी या गावांमध्ये बर्ड फ्लू सदृश्य रोगाने काही पक्षी मरतुक झाल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जंगलगी गावासह त्यालगतच्या दहा किलोमीटरचा परिसर सतर्क भाग अर्थात अलर्ट झोन म्हणून घोषित करण्याचे आदेश काढले आहेत , जिल्हाधिकाऱ्यांनी उपायुक्त पशुसंवर्धन तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद यांना संबंधित तालुक्यांमध्ये पशुसंवर्धन विभागाने सर्व कुक्कुट फार्म , परसातील कुक्कुट पालन केंद्र तपासणी करुन मरतुक पक्षी आढळल्यास नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी, सर्व कुकुट पालकांनी मृत्यू किंवा आजारी पक्षांची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांना द्यावी, एखाद्या ठिकाणी कोंबडी किंवा मृत पक्षी आढळून आल्यास मृत पक्षांच्या संपर्कात अन्य पक्षी व प्राणी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी, प्रत्येक कुक्कुट पालकाने जैव सुरक्षेबाबत काळजी घ्यावी, आजारी पक्षाची वाहतूक किंवा विक्री करू नये ,आवश्यकतेनुसार मृत पक्षांची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्याकरिता किमान तीन फूट खोल खड्डा करून चूना पावडर टाकून पक्षी पूरण्याची प्रक्रिया परवानगीने करावी अशा सूचना केल्या आहेत.