कोरूनाच्या पार्श्वभूमीवर भारत देशासाठी 16 जानेवारी हा अतिशय महत्वाचा दिवस होता या दिवशी कोरोनावर आलेल्या लसीकरणाला देशभरात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली यापूर्वी कोरूना लसीकरणाचे ड्रायरन अर्थात प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या घेण्यात आले होते शनिवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या लसीकरणाचा शुभारंभ झाल्यानंतर देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लसीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे या ठिकाणी सकाळी दहाच्या सुमारास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर त्यांच्यासह पोलीस आयुक्त अंकुश शिंदे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी येऊन पाहणी केली सकाळी ठीक साडे अकरा वाजता या लसीकरणाला सुरुवात झाली पहिली लस मेडिकल कॉलेजच्या उपअधिष्ठाता डॉक्टर पुष्पा अग्रवाल यांनी घेतली यावेळी त्यांनी लस घेतात त्यांचे सर्व उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले .
या लसीकरणानंतर त्यांना शेजारच्या ऑब्झर्वेशन रूम मध्ये ठेवण्यात आले, सुमारे अर्ध्या तासानंतर त्यांना कोणताही साईड इफेक्ट झाला नाही, त्या आनंदी होत्या,दरम्यान पहिली लस घेतलेल्या डॉक्टर पुष्पा अग्रवाल यांनी ही लस अतिशय सुरक्षित असून कोणताही साइड इफेक्ट झाला नाही यामुळे नागरिकांनी न घाबरता लस द्यावी असे आवाहन केले तसेच अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी लसीकरणाची अधिक माहिती देताना नागरिकांनी घाबरून न जाता लस घ्यावी असे आवाहन केले.. यानंतर मेडिकल कॉलेजचे लॅब टेक्निशियन संगप्पा तोडणारे यांनी दुसरी लाच घेतली दिवसभरात मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले दिवसाला शंभर कर्मचाऱ्यांना या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे