महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीउत्सव सोलापूर शहरात साजरी करण्यासाठी परवानगी देऊन लवकरच पोलिस प्रशासनाच्या वतीने ऑनलाईन शिव जन्मोत्सव परवाने सुरू करण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेड सोलापूर च्या वतीने शहराध्यक्ष शाम कदम यांनी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ईमेल द्वारे करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती काही दिवसावर येऊन ठेपली आहे 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात शिव जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते त्यादृष्टीने सोलापुरातील काही शिवजन्मोत्सव मंडळ यांनी मंडळाची बैठक घेऊन शिवजन्मोत्सव साजरा करण्याची तयारी केली आहे त्यामुळे सालाबाद प्रमाणे यंदाही वर्षी शिवजन्मोत्सव साठी पोलीस प्रशासनामार्फत ऑनलाइन शिवजन्मोत्सव परवाना लवकरात लवकर देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
माहे ऑक्टोबर नोव्हेंबर पासून दररोज येणारे रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येत मोठी घट झाली आहे तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने 18 जानेवारी 2019 च्या परिपत्रकांमध्ये राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाले असून सद्यस्थितीत ही साथ नियंत्रणाखाली आलेली आहे त्यामुळे पुढच्या महिन्यात 19 फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव साजरा करण्यात कोणतीही अडचण येणार नाही असे निवेदनात नमूद केले आहे