मोघली राजवटीच्या क्रूरकर्मा औरंग्याचे नाव हटवून औरंगाबाद चे नामकरण संभाजी नगर करावे, या साठी संभाजी आरमार ने आंदोलन उभे केले असून आज या आंदोलनात सोलापूर औरंगाबाद एसटीच्या नामफलकाला संभाजीनगर नाव लावून आंदोलन तीव्र करण्यात आले, अन्यथा महाराष्ट्रातून शिवप्रेमींच्या संतापाचा उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही,याची सुरवात सोलापूर मधून संभाजी आरमार ने केली असून शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे या वेळी संभाजी आरमार चे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांनी संतप्त भावना व्यक्त केली,या आंदोलनात संभाजी आरमार चे जिल्हाप्रमुख गजानन जमदाडे,जिल्हासंघटक अनंतराव नीळ, संजय सरवदे,शहरप्रमुख शशिकांत शिंदे,शहरसंघटक अनिल छत्रबंद,सागर संगवे,राज दवेवाले,सोमनाथ मस्के,संतोष कदम,संताजी जांभळे,गणेश ढेरे,प्रकाश बेले,सागर दासी,राजू रचा,प्रशांत नवले,प्रमोद माने उपस्थित होते.