सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका महिलेने बलात्काराचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. आता या महिलेने ही तक्रार मागे घेतली असून महिलेच्या वकिलांनीही ही केस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित महिलेने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आपली तक्रार मागे घेत असलेल्या संबंधात जबाब दिला असल्याचं यासंबंधीच्या वृत्तात म्हटलं आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली आहे. पण पुन्हा ती तक्रार मागे घेण्यावरुन मागे फिरु नये म्हणजेच मी तक्रार मागे घेतली नाही असा दावा करू नये या करता पोलिसांनी तिला आपले म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे देण्यास पोलिसांनी सांगितले होते.
त्यानुसार, रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली असे ते प्रतिज्ञापत्र तिने मुंबई पोलिसांना दिले आहे. एका वरीष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर या माहितीला दुजोरा दिला.