महाराष्ट्राचे राज्यमंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणे यांना सोलापूरचे पालकमंत्री पद मिळालं पालकमंत्री म्हणून दत्तामामा ची पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक होती, पालकमंत्री दत्तामामा बैठक कशा पद्धतीने हाताळणार याची खूप उत्सुकता होती यापूर्वी त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे अनेक दिग्गज या बैठकीला समोर हजर होते मात्र मामांनी अगदी हसत खेळत या बैठकीला तोंड दिले आक्रमक झालेल्या नेत्यांना आपल्या गोडबोल्या शैलीने शांत केले, महापालिका नगरसेवक आनंद चंदनशिवे जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश पाटील हे कायम आक्रमक असतात व आजही त्यांच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेच्या जागेवरून थोडासा वाद उफाळला होता मात्र या दोघांनाही त्याच पद्धतीने पालकमंत्र्यांनी शांत केले या बैठकीत माळशिरसचे आमदार राम सातपुते सदस्य ज्योती पाटील सदस्य अरुण तोडकर मंगल वाघमोडे सुनंदा फुले यांनी आपले मुद्दे आक्रमकपणे मांडले त्यानंतर या सभेत पंढरपूरचे सुभाष माने वसंत नाना देशमुख शैला गोडसे आमदार प्रशांत परिचारक यांनी ही आपल्या भागातले प्रश्न मुद्दे उपस्थित केले माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे करमाळा चे आमदार संजय मामा शिंदे मोहोळचे सदस्य उमेश पाटील हे आक्रमक दिसले पालकमंत्री दत्ता मामांनी माळशिरस पंढरपूर सदस्यांना आक्रमकते बद्दल विशेष कौतुक केले , आमदार राम सातपुते यांनी पूरस्थितीचा मुद्दा अतिशय आक्रमकपणे मांडला त्यांनी यासाठी तीन ते चार मिनिट आपले भाष्य केले त्यांनी आपली मागणी मांडल्यावर पालकमंत्र्यांनी एका मिनिटात सांगितले असते तरी समजले असते असे सांगून सातपुते यांची हवा काढून घेतली. जिल्हा परिषद शाळा महापालिकेला हस्तांतरण करण्याच्या विषयावर दोन देशमुख आमदारांमध्ये एकमत दिसले, काँग्रेस नगरसेविका फिरदोस पटेल यांनी भंडारा जिल्ह्यातील दवाखान्याची दुर्घटना पार्श्वभूमीवर सोलापूरात हॉस्पिटल अद्ययावत व्हावेत त्यासाठी निधीची मागणी केली त्यांनी मांडलेल्या विषयाचे विशेष कौतुक केले, पहिल्याच बैठकीवर पालकमंत्री दत्तामामा यांचेच वर्चस्व राहिले प्रशासनालाही विविध विषयावर धारेवर धरत सक्त सूचना केल्या या बैठकीत मात्र लोकप्रतिनिधींच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता पालकमंत्र्यांच्या सोबत बसलेले जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या चेहऱ्यावर पूर्ण सभेमध्ये मास्क दिसून आला नाही, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा विसर ही पडल्याचं चित्र पहायला मिळालं मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी खराब रस्त्यांचा प्रश्न उपस्थित केला, सुरू असलेल्या रस्ते कामावर नाराजी व्यक्त केली, राष्ट्रीय महामार्गाच्या कामात शाळांची जागा गेली आता शाळा कुठे भरवायच्या या प्रश्नावर सुभाष माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष केले, या सभेत एक मजेदार किस्सा असा घडला की सदस्या ज्योती पाटील या आपला विषय मांडण्यासाठी उठल्या मात्र आनंद चंदनशिवे यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती चा मुद्दा मांडला तेव्हा पालकमंत्र्यांनी सर्व उठलेल्या सदस्यांना महत्वाचा मुद्दा असल्याने बसण्याच्या सूचना केल्या त्यानंतर ज्योती पाटील यांना बोलण्याची परवानगी दिली तेव्हा ज्योती पाटील यांनी चंदनशिवे हे आपलं म्हणणं थोडक्यात मांडण्याऐवजी आपला निबंध सादर करतात त्यामुळे जादा वेळ जातो असे त्या म्हणताच संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला.या नंतर चंदनशिवे चांगलेच खजील झाले, एक महिला बोलली म्हणून बरे झाले, एखाद्या पुरुष सदस्याने हा विषय उपस्थित केला असता तर त्याचे अवघड झाले असते, बैठकीनंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी हा विषय ज्योती पाटलांना बोलून दाखवला हे विशेष.