ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी केसी वेणुगोपाल यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ची कार्यकारिणी जाहीर केली यामध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जागेवर प्रदेशाध्यक्ष म्हणून विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे या कार्यकारिणीमध्ये सोलापूर शहर मध्ये च्या आमदार प्रणिती शिंदे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे केसी वेणुगोपाल यांनी सहा कार्याध्यक्ष दहा उपाध्यक्षांच्या निवड केली आहेत यामध्ये आमदार प्रणिती शिंदे यांचा समावेश आहे आक्रमक असलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांची प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड होणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होती त्याप्रमाणे त्यांच्यावर ही जबाबदारी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने दिली आहे, काही दिवसांपूर्वी आमदार प्रणिती शिंदे यांची अनुसूचित जाती कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती त्यानंतर आता प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आहे यामुळे सोलापुरातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते विशेष करून युवा वर्गातून या निवडीचे अभिनंदन होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय