अतिवृष्टीमुळे बोरामणीसह तालुक्यातील अनेक शेतक-यांची शेती ही, पिकासह उध्दवस्त झाली,पंचनामेही झाले मात्र अद्यापही शेतक-यांना नुकसान भरपाई मिळत नसल्याबद्दल शेतकरी बांधवांतून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
१८ सप्टेंबर २०२० रोजी बोरामणीसह तालुक्यात अतिवृष्टी झाली.गेल्या चाळीस वर्षांत असा पाऊस झाला नव्हता,शेती पिकांचे मोठे नुकसान झाले तसेच शेत-शिवा-यातील बांध फुटले,शेतातील सुपीक मातीही वाहून गेली.त्यामुळे आधीच कोरोना व प्रापंचिक अडचणीत सापडलेला शेतकरी राजाचे अतिवृष्टीमुळे त्यांचे उरलेसुरले पिक उत्पादनाचे स्वप्न पाण्यातच वाहून गेले.
प्रशासनाने शेतक-यांच्या शेतातील उध्दवस्त पिकांचे पंचनामे केले.त्यांच्याकडून पासबुक व आधारकार्डाचे झेरॉक्स तलाठी कार्यालयाने घेतले.मात्र,अद्यापही शेतक-यांना नुकसान भरपाई मिळाले नाही.त्यामुळे राजाने मारले अन् पावसाने झोडपले तर दाद मागायची कुठे असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.त्यामुळे लवकरात लवकर नुकसान भरपाई शासनाने जमा शेतक-यांच्या खात्यावर जमा करावेत.अशी मागणी पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे यांनी केलेआहे त्या वेळेस आप्पा हलसगे, बाबाजान हलसगे, शंकर भगरे उपस्थित होते