वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या पुढाकारातुन विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते दक्षिण तालुक्यातील वळसंग या गावामध्ये 1937 साली भीमनगर मधील सर्व समाज बांधवांच्या वतीने बांधण्यात आलेल्या विहिरीचे उद्घाटन झाले होते तो परिसर सुशोभीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या सहा महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे त्याला यश आले आहे गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्यासोबत जिल्हा परिषद कार्यालय मध्ये बैठक झली त्यानंतर दक्षिण तालुक्यातील वळसंग या गावांमध्ये विहिरीच्या ठिकाणी प्रत्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी भेट दिली.
प्रारंभी चंदनशिवे यांनी अध्यक्ष कांबळे यांचे आभार मानत काम लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली..
सदर विहिर परिसर सुशोभीकरन करण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देताना या कामाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही अध्यक्ष कांबळे यांनी दिली.
यावेळी वळसंग या गावांमधील भिमनगर परिसरातील गावकऱ्यांच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांचे स्वागत करण्यात आले तसेच विहिरीला फुल अर्पण करून अभिवादन करण्यात आले
या भेटीवेळी जी.एम ग्रुपचे बाळासाहेब वाघमारे ,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शिवानंद पाटील, पक्षनेता अण्णाराव बाराचारे, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत ,शाखाधिकारी राजेंद्र जगताप , प्रकल्प अभियंता सज्जन भडकवाड,प्रशांत गायकवाड, वंचित बहुजन आघाडी उस्मानाबादचे नेते मिलिंद रोकडे, प्रकाश बनसोडे, भीमा मस्के वळसंग गावातील शांतकुमार गायकवाड रवींद्र गायकवाड अशोक वाघमारे संजय गायकवाड जयभीम वाघमारे संतोष गायकवाड वाघमारे दिपक गायकवाड शेटीबा गायकवाड आदी उपस्थित होते