सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती 16 सदस्यांच्या निवडी शनिवारच्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत झाल्या, भाजपकडून आठ जागा शिवसेनेकडून 3 काँग्रेस 2 वंचित बहुजन आघाडी 1 राष्ट्रवादी एक आणि एमआयएम पक्षाकडून एक अशा जागेची निवड होणार होती, यामध्ये भाजप शिवसेना वंचित बहुजन आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या जागा निश्चित होत्या मात्र एम आय एम कडून कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता होती त्यामध्ये शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांनी तोफिक शेख यांना शह देण्यासाठी त्यांच्या प्रभागातून निवडून आलेल्या अझहर हुंडेकरी यांच्या नावाची शिफारस केली तसे पत्र गटनेते रियाज खरेदी यांच्याकडून घेतले होते त्याप्रमाणे फारूक शब्दी यांनी तडकाफडकी सकाळी साडेनऊ वाजता आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन स्थायी समितीसाठी अझहर हुंडेकरी यांच्या नावाची घोषणा केली.
सभेची वेळ साडेअकराची होती मात्र एमआयएम पक्षाच्या तीन पत्रामुळे सभा सुरू व्हायला पावणेदोन वाजले एम आय एम पक्षाकडून 2017 साली नूतन गायकवाड या गटनेत्या झाल्या होत्या विभागीय आयुक्त यांच्याकडे अजून ही नूतन गायकवाड गटनेते असल्याची नोंद आहे त्याचा आधार धरून तोफिक शेख यांच्या गटाने पूनम बनसोडे व तसलीम शेख यांच्या नावाची शिफारस केली रियाज खरादी हे मात्र या सभेला गैरहजर होते अहजर हुंडेकरी यांनी पक्षाचा अध्यक्ष शाब्दी यांनी दिलेल्या पत्राची शहानिशा महापौरांकडे केली त्यानंतर जेव्हा नगर सचिव दंतकाळे यांनी सोळा सदस्यांची नावे वाचली त्यामध्ये एमआयएम कडून केवळ गटनेते रियाज खरादी यांनी स्वतःचं नाव दिल्याचं समोर आलंय नूतन गायकवाड यांनी दिलेल्या पत्राला महापौरांनी झिडकारले तेव्हा तोफिक शेख यांनी महापौरांना चांगलाच दम भरला चुकीचं होत असेल तर आपण कोर्टात जाऊ असा इशारा दिला .
परिवहन समितीसाठी सहा नव्या सदस्यांची निवड होणार होती यामध्ये ही एमआयएम कडून पक्षाने आत्तार या कार्यकर्त्याचे नाव दिलं होतं मात्र गटनेते रियाज खरादी यांनी आपल्या पदाच वजन वापरून स्वतःच्या मुलाला परिवहन समिती मध्ये सदस्य केले हे समजताच सभागृहामध्ये असलेले अहजर हुंडेकरी गाजी जहागिरदार यांनी डोक्याला हात लावून हे काय झालं म्हणून बाहेर पडले रियाज खरादी यांनी गटनेते पदाचा फायदा घेत आपला गेम प्लान सक्सेस केला, तौफिक शेख व फारूक शाब्दी यांच्यातील भांडणाचा पुरेपूर फायदा घेत राहिलेले शेवटचे वर्ष त्यामुळे संधी साधून घेऊ या भूमिकेत त्यांनी स्वतःसह स्वतःच्या मुलाला ही पद दिले, 2017 साली भाजपची सत्ता महापालिकेवर आली केवळ पहिल्याच वर्षी स्थायी समितीच्या निवडी झाल्या दुसऱ्या वर्षी मात्र शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढाई सुरू झाली सभापती निवडीवेळी वाद न्यायालयात गेला आणि तेव्हापासून सभापती निवडीला स्टे होता अखेर तो स्टे उठला आणि शेवटच वर्षे म्हणजेच 2021 साली स्थायी समिती गठीत करण्याचं ठरलं आता स्थायी समितीच्या 16 सदस्यांमध्ये भारतीय जनता पार्टी कडे आठ आणि उर्वरित विरोधी पक्षांकडे आठ असे बलाबल आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीने या प्रकरणांमध्ये आपला प्लॅन सक्सेस केला, एम आय एम पक्षाने वरिष्ठांच्या आदेशानुसार आलेले नाव असतानाही गटनेते रियाज खरादी यांचे स्वतःच्या नावाचे पत्र मंजूर केले यावरून रियाज खरादी आता स्थायी समिती सभापती निवडीत भाजपला मतदान करतील अशी शक्यता आतापासूनच वर्तवली जात आहे त्यामुळे भाजपची डोकेदुखी कमी झाल्याचे चित्र आहे, भाजपमध्ये अंबिका पाटील यांचे नाव जवळजवळ सभापतीपदासाठी निश्चित झाल्याची चर्चा आहे महापौर निवडीवेळी सव्वा सव्वा वर्ष करण्याचे ठरले होते मात्र आता त्यावर कुणीही बोलत नाही शेवटी स्थायी समिती सभापती पद अंबिका पाटील यांना देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याच्या तयारीत भाजप आहे. भविष्यात जर रियाज खरादी यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केले तर निश्चित परिवहन सभापती पदावर त्यांच्या मुलाला भाजप बसवले तर नवल वाटू नये असेही आता महापालिकेच्या वर्तुळात बोलले जात आहे. खरादी यांच्या भूमिकेमुळे निश्चितच शहराध्यक्ष फारुक शाब्दी हे सुद्धा तोंडघशी पडले आहेत, मी एमआयएम पक्षाचाच असे खरादी सांगत सुटले आहेत, अझहर हुंडेकरी यांच्यासाठी आपण राजीनामा देऊ असे ही खरादी बोलत आहेत, ही केवळ बोलाची कडी अन बोलाचाच भात आहे, खरादी यांनी तोफिक शेख यांच्यासोबत राहून त्यांचा गेम बजावला आता एमआयएम वरिष्ठांकडून खरादी यांच्यावर काय कारवाई होते याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. जर विभागीय आयुक्तांनी तौफिक शेख यांच्या तक्रारीवर सुनावणी घेऊन निकाल दिला तर पुन्हा स्थायी समिती सभापती निवड अडचणीत येऊ शकते?