राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकार सतर्क झाले आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला आठ दिवस दिले आहेत त्यानंतर ते परिस्थिती पाहून काय निर्णय घ्यायचा ते ठरवतील दरम्यान सरकारने विशेष करून लग्न सोहळयांवर लक्ष केंद्रित केले आहे लग्नाला मोठी गर्दी पडत असल्याने मंगल कार्यालय तपासणी करून त्यांना दहा हजार रुपये दंड करण्याच्या सूचना सरकारने केल्या आहेत सोलापुरात जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त यांनी आदेश काढून सर्व मंगल कार्यालयांची तपासणी चित्रपटगृहांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत, मंगल कार्यालयांमध्ये 50 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी देण्यात आली नाही त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आपल्या तपासणीत सात रस्ता परिसरातील उपलप मंगल कार्यालयाला तब्बल दहा हजार रुपये दंड केला आहे या मंगल कार्यालयात लग्न सोहळ्यावेळी वेळी 50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आले आहेत,सोलापूरकरांना लॉकडाऊन नको असेल तर सरकारचे नियम पाळा मास्क वापरा गर्दी करू नका हात वारंवार सॅनिटायझरने धुवा अशा सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.
सोलापूर पोलिसांनी बिष्णोई गँगमधील दोघांना केली अटक ; प्रकरण आहे तरी काय?
सोलापूर पोलिसांनी बिष्णोई गँगमधील दोघांना केली अटक ; प्रकरण आहे तरी काय? सोलापुरातील स्कॉर्पिओ गाडी चोरी प्रकरणाचे धागेदोरे थेट राजस्थान...