सोलापूरच्या राजकारणाला वळण देणारा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक समजले जाणारे आमदार संजय मामा शिंदे आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे दोघे एकमेकांच्या शेजारी बसून गप्पा मारण्याचं कधी पाहिले का ?मात्र तो योग जुळून आला माढा तालुक्यातील अरण गावात एका लग्न समारंभात. जिल्हा ग्रंथालय संघाचे हरिदास रणदिवे यांच्या मुलाच्या लग्न होते त्या लग्नाला आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आले होते काही वेळाने आमदार संजय मामा शिंदे त्या लग्नाला आले आमदार रणजित दादांच्या शेजारी माजी सभापती शिवाजी कांबळे हे एकाच सोप्यावर बसून गप्पा मारत होते मात्र संजय मामा येताच शिवाजी कांबळे उठले आणि त्याठिकाणी संजय मामांना बसण्याची विनंती केली संजयमामानी मोठ्या मनाने रणजित दादाच्या शेजारी बसले, केवळ बसलेच नाहीत तर त्या दोघांनी एकमेकांशी गप्पाही मारल्या ची माहिती जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे यांच्याकडून कळाली. आमदार संजय मामा शिंदे आणि आमदार रणजित दादा हे दोघे एकेकाळचे घनिष्ठ मित्र. मात्र काही कारणास्तव ते एकमेकांचे राजकीय शत्रू झाले, काही घडामोडी अशा घडत गेल्या की त्यांचं शत्रुत्व वाढत गेलं जरी ते दोघे कुठल्या कार्यक्रमाला आले तर एकमेकाकडे पाहत नव्हते अनेकांच्या मनात या दोन्ही नेत्यांनी पून्हा एकत्र यावं अशी इच्छा होती आमदार संजय मामा शिंदे यांच्या मुलाच्या लग्नात हा योग जुळून येईल अशी अपेक्षा होती मात्र तसे झाले नाही शेवटी तो सुवर्णयोग हरिदास रणदिवे यांच्या मुलाच्या लग्नात जुळून आला , हा योग सोलापूर जिल्ह्याच्या भविष्यातील राजकारणाला टर्निंग पॉईंट ठरणारा असेल अशी चर्चा आतापासूनच वर्तवली जात आहे.
चार पिस्तूल 24 जिवंत काडतूस जप्त ; जन्मठेपेची शिक्षा भोगणारा फरार आरोपी लागला ग्रामीण पोलिसांच्या हाती
चार पिस्तूल 24 जिवंत काडतूस जप्त ; जन्मठेपेची शिक्षा भोगणारा फरार आरोपी लागला ग्रामीण पोलिसांच्या हाती सोलापूर : खूनाच्या गुन्ह्यात...