सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने शुक्रवारी बाल रोग तज्ञ सोबत जिल्हा परिषद डॉक्टरांची ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली यामध्ये येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पूर्वीची तयारी करण्यात येत आहे., एकाही बालकाला कोरूना होऊ नये यासाठी जिल्हा परिषद प्रशासन प्रयत्नशील आहे, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने दिनांक 10 जून ते 10 जुलै या एक महिन्याच्या कालावधीत शून्य ते सहा वयोगटातील सुमारे दोन लाख नव्वद हजार बालके तसेच 7 ते 15 वयोगटातील सुमारे पाच लाख बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे या तपासणीनंतर पुढील दिवसात काही दोष आढळल्यास त्या बालकांचे रक्त, हिमोग्लोबिन, पांढऱ्या पेशी, प्रोटीन न्यूट्रिशन, विटामिन, आयरन अशा अनेक बाबींची तपासणी करण्यात येणार आहे त्यानंतर त्या बालकावर उपचार करण्यात येतील, एकूणच सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक बालकाच्या आरोग्याचा सात बारा उतारा जिल्हा परिषद तयार करत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.पहा काय म्हणतात ते हा व्हिडीओ