सोलापूर शहर आणि जिल्हा काँग्रेसने केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या दरवाढीच्या विरोधात मोठे आंदोलन केले शहरांमध्ये ठीक ठिकाणी तसेच ग्रामीण भागात ही इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली, वेगवेगळ्या आयडीया या कार्यकर्त्यांनी लावल्या होत्या काहींनी पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ भंगारच्या गाड्या विकायला काढल्या, काहींनी महागाईचा भस्मासुर नरेंद्र मोदी म्हणून निदर्शने केली, पंतप्रधान मोदीने मारले पेट्रोल दरवाढीचे शतक अशा प्रतीकात्मक आंदोलनाने लक्ष वेधले. याच दरम्यान युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुमित भोसले यांचे हे आंदोलन आज लक्षवेधी ठरले त्यांनी तर वाहन ऐवजी घोड्यावर बसून चेहऱ्यावर पंतप्रधान मोदी यांचा मुखवटा, हातात पेट्रोल भरणारे प्रतीकात्मक मशीन आणि डोक्यावर हेल्मेट असे आगळेवेगळे आंदोलन केले शेवटी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले मात्र या आंदोलनाचे फोटो व्हाट्सअप फेसबुक यासह इतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं या आंदोलनाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आहे.