” आज दुपारच्या सव्वा बारा वाजल्या असतील मी हैद्राबाद रोड हायवे वरून माझे इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायचे काम आटोपुन सोलापूर शहराकडे येत असताना एक मुलगा भर उन्हामधून एकटाच हातामध्ये कसलातरी बोर्ड घेऊन जाताना मला दिसला … माझी उत्सुकता वाढली सहज त्याच्या जवळ जाऊन पाहिले तर अभिनेते सोनू सूद यांचा फोटो असणारा बोर्ड माझ्या नजरेस आढळला …. मी त्याला त्याचे नाव विचारले आणि तू कोठे चालला आहेस असे विचारले …. मेरा नाम हरीजन व्यंकटेश है और मैं सोनू सूद सहाब से मिलने हैद्राबाद to मुंबई पैदल जा रहा एक बार उनसे मिला तो गॉड से मिला ….. ‘ सहाब अपने लिये कोई भी जीता है दुसरोकेलिये जीने वाला भगवान होता है ” हे शब्द बोलताना त्याच्या डोळे भरून आले होते ….. मला काही सुचेनासे झाले त्या क्षणी ……… मी त्याला काही मदत हवी का असे विचारताच तो म्हणाला ‘ No …. But thanks sir ……… कोण कुठला व्यंकटेश सोनू सूद ला भेटण्यासाठी 1000 किलोमीटर चे अंतर पायी चालत जातो तर महान अभिनेता सोनू सूद कलयुगामध्येही सढळ हाताने कितीतरी जणांच्या डोळ्यातील पाणी पुसतो ……… सर्वकाही रोमांचित करणारे आहे “
——- प्रफुल्ल सुरेश मस्के
लेखक , दिग्दर्शक
मराठी चित्रपटसृष्टी