काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी आपले बाळासाहेब थोरात प्रेम कायम ठेवत प्रदेशाध्यक्ष बदलूनही चार महिन्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्या जिल्हा कार्यालयात नूतन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोटो लावला नाही ही बाब जेव्हा काही प्रसारमाध्यमांच्या लक्षात आली तेव्हा माध्यमांनी हा विषय सर्वांसमोर आणला.
शहर कार्यालयात मात्र काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी राष्ट्रीय नेते राहुल गांधी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नूतन कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे या सर्वांचे फोटो आपल्या कार्यालयात शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी लावले आहेत आणि हा कार्यालयाचा प्रोटोकॉल समजला जातो,
जिल्हा कार्यालयात नाना पटोले यांचा फोटो नसल्याने प्रसारमाध्यमांसह मधून या बातम्या छापून आल्या, बातम्या येऊन चार दिवस झाले तरी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांना याचे काही देणेघेणे नसल्याचे पाहायला मिळालं. शेवटी जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी याची दखल घेत जिल्ह्याच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रदेश कार्याध्यक्ष तथा सोलापूरच्या आमदार प्रणितीताई शिंदे यांचे फोटो मोठ्या थाटात बसवले. हे फोटो जिल्हा कार्यालयात आल्याने काँग्रेसचा प्रोटोकॉल पूर्ण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
2014 पासून काँग्रेस पक्षाला अपेक्षित असा जिल्हाध्यक्ष मिळालेला नाही प्रकाश पाटील हे साधारण सहा वर्षे झाले जिल्हाध्यक्ष पदावर आहेत मात्र त्यांच्या पदाची कारकीर्द पाहता त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर आहे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मरगळ असून ती मरगळ घालवणारे आक्रमक असे जिल्ह्याला नेतृत्व अपेक्षित आहे.
सुरेश हसापुरे यांचे नाव कायम जिल्हाध्यक्षपदाचा रेसमध्ये आहे, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पाहिल्या तर कॉंग्रेसला निश्चितच हसापुरे हे न्याय देतील अशी चर्चा जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ही आहे.