सोलापूर जिल्हा परिषदेत निधी वाटपावरून बराच गोंधळ सुरू आहे, नावालाच जिल्हा परिषदेत भाजप समविचारी आघाडी आहे, कुणाचा कुणाला मेळ नाही, अक्कलकोट आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी पक्षनेते आनंद तानवडे यांच्यात पक्षांतर्गत वाद आहे, यात दोन देशमुख आमदारांच्या गटबाजीचा वास येतो, तसेच तानवडे यांना पक्षनेते पदावरून काढून अण्णाराव बाराचारे यांना पक्षनेता केले यांचीही नाराजी आहे, त्यामुळेच बाराचारे असतील की आमदार कल्याणशेट्टी यांना निधी दिला की तानवडे यांना सहन होत नाही असे बोलले जाते. हा वाद भाजपच्या अवघड जागेचे दुखणे झाल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील व पक्षनेते बाराचारे यांच्या सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेतली, पत्र दिले, मागील काही महिन्यात जिल्हा परिषदेत लेटर बॉम्बची चर्चा आहे, दरम्यान आमदार कल्याणशेट्टी यांनी यापत्रात माझ्या अक्कलकोट विधानसभेतील जि.प. सदस्यांनी केलेल्या तक्रारीनुसार निधीवाटपामध्ये सर्व सदस्यांना निधी असंतुलन वाटप झाले आहे. दुसऱ्या तालुक्याच्या तुलनेने अक्कलकोट विधानसभेला निधी वाटपाबाबत दुजाभाव होत आहे. यापूर्वी असे घडलेले असताना, अत्तासुध्दा असे प्रकार होत असल्याचे जि.प. सदस्यांची तक्रारी येत आहेत. त्यांच्या तक्रारीला अनुसरून मला जिल्हा परिषदेकडून मागील आर्थिक वर्षातील व चालू आर्थिक वर्षातील जनसुविधा, नागरीसुविधा, तीर्थक्षे विकास निधी वित्त आयोग, जि.प. सेस आणि 30/54, 50/54 नाला खोलीकरण व सरळीकरण इ. निधी वाटप करण्यात आले. त्याची जिल्ह्यातील तालुकानिहाय किती निधी वितरीत करण्यात आले, त्या कामाचे नांव, मंजूरी आदेश आणि काम मंजूरीला कोणते निकष लावले याची तालुका निहाय माहिती त्वरीत मिळावी, अशी मागणी कल्याणशेट्टी यांनी केली.