कोरोनामुक्त गाव ही संकल्पना आपली आहे, आपल्याच जिल्ह्यातील गावांनी या स्पर्धेत बाजी मारली पाहिजे अशी अपेक्षा सीईओ दिलीप स्वामी यांनी सरपंचांसमोर व्यक्त केली .
राज्य सरकारने कोरोनामुक्त गाव ही स्पर्धा आयोजित केली आहे, मार्च 2022 पर्यंत या स्पर्धेचा कालावधी आहे, दरम्यान याच पार्श्वभूमीवर राज्य सरपंच परिषदेच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील अनेक सरपंचांनी गुरुवारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेतली, यावेळी परिषदेचे प्रदेश सरचिटणीस ऍड विकास जाधव, जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख, महिला जिल्हाध्यक्षा कविता घोडके पाटील, समन्वयक पंडित ढवण,कुलदिप कौलगे, भाऊसाहेब लामकाने, पंडीत खरे,अँड धनंजय बागल डाँ. अमोल दुरंदे,शिवशंकर ढवण,सुधाकर मिरगणे,विकास माने ,डॉ. रजनी सुरवसे,संभाजी पाटील, अरुणा गवळी,चंद्रप्रभा भास्कर,संतोष कुंभार, जयश्री पाटील,रावसाहेब पाटील भावना बिराजदार, जयश्री सगरे,गणपत यादव आदि उपस्थित होते,
दरम्यान सीईओ स्वामी यांनी सरपंचांशी संवाद साधताना माझे गाव कोरोनामुक्त गाव ही संकल्पना सोलापूर जिल्हा परिषदेने सर्वात पहिला सुरू केली, आपण कोरोनाची जनजागृती केली त्यामुळे शेकडो गावे ही कोरोनामुक्त आहेत, आता शासनाने गाव कोरोनामुक्त ही स्पर्धा जाहीर केली आहे, या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याने बाजी मारली पाहिजे अशा सूचना करत प्रशासन म्हणून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
एडवोकेट विकास जाधव यांनी अधिक माहिती देताना प्रशासनाच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. 10 लाखाच्या पुढे ई-टेंडर पद्धत सुरू झाली आहे, त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर 10 लाखाची कामे करता येणार आहेत, परंतु झेडपी बांधकाम विभागाकडून तसा आदेश ग्रामपंचायतला आलेला नाही, तो आदेश मिळावा अशी मागणी केली.