जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिनांक 5 जून रोजी वसंत विहार येथील बागेत गार्डन गृपच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ॲड.शिरीष जगताप, डॉ.रमेश शेंडगे, राजन परदेशी, नरेंद्र सोमानी, त्रिमूर्ती राऊत, बिपिन कुलकर्णी, अमोल पवार, बाळासाहेब पडळकर, अनिरुद्ध पवार, रमेश रंपुरे हे गार्डन गृपचे सदस्य उपस्थित होते. यावेळी अनंत, जांभूळ,आंबा, कोरंटी या झाडांची व रोपांची लागवड करण्यात आली.
सुमारे एक एकर क्षेत्रावर नयनरम्य अशी ही बाग असून दररोज सकाळी परिसरातील नागरिक या बागेत फिरायला येतात. यामुळे सकाळच्या व्यायामाबरोबर पर्यटनाचा देखील आनंद मिळतो. गार्डन गृपच्या वतीने वर्षभर नानाविध कार्यक्रम येथे आयोजित करण्यात येतात.