तेलंगणातील एका चाहत्याने सोनूला भेटण्यासाठी तब्बल ७०० किलोमीटर पायी प्रवास केला आहे. व्यंकटेश हरिजन असे त्याचे नाव असून तो हैदराबादहून मुंबईला अनवाणी चालत आला आहे. तेलंगणाच्या विकाराबाद जिल्ह्यातील दोरनापल्ली या गावचा तो रहिवाशी आहे. व्यंकटेश हा बारावीला शिक्षण घेत आहे. त्याचे वडिल ऑटो रिक्षा चालवतात, तर आईचे निधन झाले आहे. व्यंकटेशने 1 जून रोजी आपल्या मुंबई प्रवासासाठी प्रस्थान केले होते. तब्बल 10 दिवसानंतर तो मुंबईत पोहोचला आहे.
सोनूला भेटण्यासाठी त्याने हा लांबलचक पल्ला गाठला. सोनूने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन व्यंकटेशसोबतचा फोटो शेअर करत एवढ्या भरीव प्रेमासाठी आभार मानले आहेत.
वेंकटेश, मला भेटण्यासाठी हैदराबाद ते मुंबई पर्यंत सर्व मार्ग अनवाणी फिरला आहे. तो खरोखर प्रेरणादायक आहे आणि त्याने मला खूप नम्र केले आहे,
मात्र मी तथापि, कोणालाही हे करण्याचा त्रास घेण्यासाठी प्रोत्साहित करू इच्छित नाही,