उत्तर सोलापूर तालुका पंचायत समितीच्या सभापती रजनी भडकुंबे यांनी गट विकास अधिकारी जस्मिन शेख यांचा कारभार व वर्तणूक विरोधात त्यांची अनेक वेळा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे तक्रार केली होती. बीडिओ जस्मिन शेख या प्रोटोकॉल तोडतात, ऑफिस मध्ये कामाची पद्धत चुकीची असून त्या कार्यालया ऐवजी आपल्या घरात बसून काम करतात, फिल्डवर जात नाहीत, कोरोना काळात पाट्या टाकण्याचे काम केले, कर्मचाऱ्यांना घालून पाडून बोलणे, सभापती यांच्यासोबत वाद झाल्यानंतर त्यांच्या विरोधकांना घेऊन केबिनमध्ये चर्चा करणे, तसेच पंचायत समितीच्या एका मासिक सभेमध्ये दोन सदस्य गैरहजर असतानाही त्यांच्या परस्पर सह्या बीडीओ जस्मिन शेख यांनी घेतल्या आहेत, कर्मचाऱ्यांवर चिडचीड करणे विशेष करून पुरुष अधिकाऱ्यांना वाईट वागणूक देणे अशा एक ना शेकडो तक्रारी सभापती भडकुंबे तसेच कर्मचारी संघटनांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कानावर घातल्या होत्या, अनेक वेळा त्याच तक्रारी येत असल्याने शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी मंगळवारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांना घेऊन ते पंचायत समितीच्या कार्यालयातच गेले, सभापती, गटविकास अधिकारी व पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी या सर्वांची बैठक घेतली समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, वारंवार येत असलेल्या तक्रारी सहन केल्या जाणार नाहीत अन्यथा चौकशी लावेल अशी तंबी देत सीईओ स्वामी यांनी समन्वयाने काम करा परत तक्रार येऊ देऊ नका अशा सूचना बीडिओ शेख यांना केल्या, सभापती व गटविकास अधिकारी यांचे मनोमिलन केल्यानंतर स्वामी व राऊत हे जिल्हा परिषदेकडे निघून गेले त्यानंतर सभापती भडकुंबे यांनी बीडिओ शेख यांना बोलावणं पाठवलं मात्र आपला इगो हर्ट झाल्याच्या अविर्भावात त्या सभापतींच्या केबिनमध्ये न येता निघून गेल्याचे समजले, जस्मिन शेख यांचे वागणे असेच राहिले तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देऊन तक्रार करेन अन्यथा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा सभापती रजनी भडकुंबे यांनी दिला आहे. उलट महिला सभापती व महिला गटविकास अधिकारी असताना समन्वयाने चांगले काम होते, मात्र बीडीओ शेख यांना नेमकी अडचण काय? कसली घमेंड आहे असे प्रश्न कर्मचारी उपस्थित करतात.