राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी पुणे मांजरी येथील निसर्ग कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली या बैठकीला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे सोलापूर शहरातील शहराध्यक्ष भारत जाधव कार्याध्यक्ष संतोष पवार , माजी महापौर मनोहर सपाटे, महेश गादेकर, जनार्दन कारमपुरी, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे नगरसेवक किसन जाधव, महिला नेत्या विद्या लोलगे, यांच्यासह माजी महापौर महेश कोठे यांची या बैठकीला उपस्थिती होती. या बैठकीत आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाची चर्चा झाली, शरद पवार यांनी महापालिका निवडणुकीचे सर्वाधिकार महेश कोठे यांना देण्याचे ठरवले असल्याची खात्रीशीर माहिती समोर आले आहे.
सोलापूर महापालिका ताब्यात घ्यायची असेल तर केवळ आणि केवळ महेश कोठे यांच्याशिवाय ते शक्य नाही असेही काही नेत्यांचे म्हणणे आले, महेश कोठे यांनी मनोहर सपाटे दिलीप भाऊ कोल्हे या दोन्ही नेत्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतल्याची माहिती आहे. महेश कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे अनेक राष्ट्रवादी नेत्यांनी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा प्रवेश कधीचाच निश्चित झाल्याचे या दिलेल्या जबाबदारी वरून दिसून येतो,
येत्या 23 जून रोजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे, सोलापूर महापालिकेत काँग्रेसची कायम सत्ता राहिली आहे, काँग्रेसच्या एका नेत्याने मंगळवारीच महापालिकेत पुढील महापौर हा काँग्रेसचा असणार असे भाकीत केले होते त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण जबाबदारी महेश कोठे यांच्यावर दिल्याने आता महेश कोठे यांना रोखण्यासाठी काँग्रेस कोणता राजकीय डाव आखणार याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.