नमस्कार..
सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे खूप खूप आभार..!
मागच्या आठवड्यात माझी………..,
सचिव., राष्ट्रवादी युवक काँग्रेस., महाराष्ट्र राज्य., या पदावर नियुक्ती झाल्यावर आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
काहीजणांना आनंद झाला तर काहींनी आश्चर्य व्यक्त केलं. इथं मला स्पष्ट करावं वाटतं की., मी मुंबई विद्यापीठ येथे कॉलेजला असताना सन – 2012 ते 2014 या कालावधी मध्ये., उपाध्यक्ष., राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस या पदावर काम केलं आहे आणि तेव्हापासून पक्षाशी नाळ जोडली गेली.
त्यानंतर योगायोगाने सुभाष बापू देशमुख यांच्याशी संपर्क आला आणि मी ते सहकार मंत्री असताना त्यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले. त्यामुळे काहीजणांचा गैरसमज झाला होता की मी भाजपा या राजकीय पक्षाचे काम करतो. सदर कालावधी हा माझा एक प्रोफेशन म्हणून पाहिला जावा., त्यापलीकडे काही नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसच का..?
याच एकमेव कारण म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब.
शिवराय-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने वाटचाल करणारा पुरोगामी महाराष्ट्र हा वैभवशाली केला तो म्हणजे आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी आणि तो वारसा त्याच ताकदीने पेलला तो पवार साहेबांनी. समाजातील सर्व जातींना आणि धर्मांना सोबत घेऊन सर्वांगीण विकास करणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस जवळचा आणि आपला वाटतो.
आज कुठंतरी पुरोगामी महाराष्ट्र ही ओळख कमी होतेय. ज्यांच्या दोनवेळेच्या पोटाचा प्रश्न सुटलाय ते बेधडक धर्मांदाच्या गप्पा मारताना दिसतात. पण., त्यांच्या एक लक्षात येत नाही की देशातील ज्या राज्यात धर्माचे कार्ड वापरून आजपर्यंत राजकारण केलं गेलं ती राज्य प्रगतीच्या बाबतीत कुठं आहेत आणि आपला महाराष्ट्र कुठं आहे.
कोणी कितीही काहीही म्हणालं तरी आपल्या राज्याची पुरोगामी ही ओळख जपली पाहिजे., टिकली पाहिजे., त्यासाठी काम केलं पाहिजे. हाच विचार घेऊन सक्रिय होण्याचं ठरवलं.
राज्याला अजून वैभवशाली करण्याची ताकद ही पुरोगामी या विचारात आहे.
सदर पदावर नियुक्ती करण्यासाठी ज्यांनी शिफारस केली असे आमचे आदरणीय राहुल भैय्या मोटे आणि आदरणीय वैशाली ताई मोटे यांचे खूप खूप आभार.
कधीतरी नव्याने सुरुवात करायची होतीच ती केली आहे., तुमच्या शुभेच्छा आहेतच.