जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने इंधन दरवाढ व महागाईच्या विरोधात आंदोलन सुरू होते या आंदोलनात शेकडो विडी कामगार महिला सहभागी होत्या, याचवेळी काही महिला आंदोलनस्थळी विडी वळण्याचे काम करत होत्या हे पाहून त्या ठिकाणी बंदोबस्तला तैनात असलेल्या सदर बजार पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले यांना राहवले नाही या महिलांची कला पाहून त्यांनीही एक विडी वळण्यासाठी तो पत्ता आणि काहीशी तंबाखू हातावर घेतली त्यांनी प्रयत्न केला मात्र त्यांना ते जमलेच नाही पहा हा व्हिडिओ