सोलापूर : दक्षिण मतदार संघाचे माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यात दिलीप माने वाढदिवस गौरव समिती गठीत करण्यात आली असून दोन्ही तालुक्यातील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये होणाऱ्या रक्तदान शिबिराला मंद्रूप गावातून सुरुवात होणार आहे. 23 जुलै मंद्रूप, 27 जुलै सादेपूर, 28 जुलै निम्बर्गी व 29 जुलै माळकवठा तसेच भंडारकवठे या ठिकाणी रक्तदान शिबिरासह गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मोफत सायकल वाटप होणार आहे. एक ऑगस्ट रोजी वडापूर औज मंद्रूप आणि कुसुर या ठिकाणी रक्तदान शिबिर होणार आहे.