सोलापूर : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची महात्मा फुले जन आरोग्य योजना मुंबईच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांची सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली.
शुक्रवारी बदली झाली आणि शनिवारी लगेच सकाळी नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शंभरकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मनाचा मोठेपणा यावेळी दिसून आला त्यांनी स्वतः आशीर्वाद यांना हाताशी धरून खुर्चीवर बसवले आणि त्यांचे स्वागत केले.
नूतन जिल्हाधिकारी यांचे पावणे बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन झाले यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार आणि उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पदभार देण्याची शासकीय प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी मुख्यालयातील सर्वच उपजिल्हाधिकारी तहसीलदार उपस्थित होते. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे स्विय सहाय्यक असिफ शेख व आमदार संजय मामा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक संजय आंबोले यांनी नूतन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचे स्वागत केले.
पदभार घेताच ते म्हणाले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर जिल्ह्यातील सर्व खासदार आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देणारे सुरू असलेले सर्वच कार्यक्रम यापुढेही तितक्याच प्रभावीपणे राबू असे आशीर्वाद यांनी सांगितले.
नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे वडील मोठे शिवभक्त असल्याने त्यांनी सोलापूर शहरातील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन प्रथम दर्शन घेतले त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले. आशीर्वाद यांचा परिचय काय आहे ते ऐका या व्हिडिओ मधून…