रेखा महेश जाधव वय 37, असे त्या आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या महिलेचे नाव आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास कंबर तलावात पाण्यात पडलेल्या अवस्थेत मिळून आली, नागरिकांच्या निदर्शनास येताच तिला त्वरित बाहेर काढण्यात आले, सदर बझार पोलिसांनी त्वरित पेट्रोलिंगच्या गाडीत घालून उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले, तिला नाव विचारले असता तिने रेखा महेश जाधव वय 37 असे सांगून ती लगेच बेशुद्ध झाली,
सदर महिला सोमवारी सुद्धा कंबर तलाव परिसरात फिरत असल्याचे अनेकांना निदर्शनास आले होते, तिला विचारले असता घरात भांडण झाले म्हणून सांगत होती, तिला पोलिसांनी हटकले होते असे सांगण्यात आले, कंबर तलाव हा मृत्यूचा सापळा झाल्याचं चित्र आहे, काही दिवसांपूर्वी एका युवकांचा मृतदेह मिळून आला होता तो बांधकाम कामगार असल्याचे स्पष्ट झाले होते, ती आत्महत्या होती की कुणी मारून टाकले हे नंतर समजले नाही. त्यामुळे कंबर तलाव धोकादायक बनल्याचं चित्र आहे.




















