सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्रीशैल नरोळे यांनी तब्बल तीन वर्षानंतर राजीनामा दिला आहे. मागील काही दिवसांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजकारण तापले असून ज्येष्ठ नेते माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे, काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी सभापती विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयात जाऊन राजीनामा देण्याची मागणी केली होती तसेच उपसभापती नरोळे यांनी पहिल्यांदा राजीनामा द्यावा अशी आक्रमक मागणी नेत्यांची होती.
त्यानंतर विजयकुमार देशमुख यांनी राजीनामा देण्याची भूमिका दर्शवली मात्र त्यांनी राजीनामा दिलाच नाही,दोन दिवसांपूर्वी पत्रकारांसमोर देशमुखांनी आणून दाखवा माझ्यावर अविश्वास असे थेट आव्हानच दिले शेवटी सिद्धाराम म्हेत्रे, काका साठे, दिलीप माने, सुरेश हसापुरे यांनी देशमुख यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी नियोजन सुरू केले बहुतांश याची कुणकुण देशमुख यांना लागली असावी,
बुधवारी पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये काका साठे यांच्या चेंबरमध्ये दिलीप माने व सुरेश हसापुरे यांची बैठक झाली, याच पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी उपसभापती नरोळे यांनी आपला राजीनामा सभापती बाजार समिती यांच्या नावाने राजीनामा दिला. उपसभापती पदासाठी काका साठे यांचे चिरंजीव जितेंद्र साठे यांचे नाव आघाडीवर आहे .आता सभापती विजयकुमार देशमुख राजीनामा कधी देतात याकडे राजकिय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.



















