अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रामवाडी Upc सेंटर येथे 22 जुलै रोजी ज्या नवजात बालकाचा जन्म झाला. त्या बालकाच्या नावे बँकेमध्ये (5000) पाच हजार रुपये एफडीची रक्कम मोहोळ मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांच्या हस्ते बाळाची आई मंजू दिपक चव्हाण, शांतावा होसमणी, आजुन वडोडगी, नाजरीन हवलुर, परवीन बानो छपरबंद, बिस्मिल्ला खान, बाळाच्या माता यांना बँकेचे ठेव प्रमाणपत्र व बेबीकिट देण्यात आले.
सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ईच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लब व सोलापूर महानगरपालिकेचे राष्ट्रवादी गटनेते तथा नगरसेवक किसन जाधव ,नागेश गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमानाने 22 जुलै ते 25 जुलै 2023 दरम्यान शंकर भवन मंगल कार्यालय उदय विकास शाळेच्या समोर लिमयेवाडी सोलापूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हास्तरीय पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील 25 संघाने सहभाग नोंदविला आहे. आकर्षक रोख बक्षिसे व अजित दादा चषक असे ठेवण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन आमदार यशवंत माने व कार्यक्रमाचे अध्यक्ष करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
कैकाडी समाजातील भगिनी व तरुणांनी यांनी एमपीएससी mpsc स्पर्धा परीक्षेत उलेखनिय यश संपादन केल्या बद्दल कू .आरती नागनाथ जाधव (PSI) रुपाली राजेंद्र जाधव (PSI) कु.अबोली मधुकर गायकवाड (मंत्रालय सहाय्यक) आलोक भारत जाधव (PSI)प्रदीप परशुराम जाधव (मंडल अधिकारी)अजित दादा पुरस्कार व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जात आहेत. ज्या योजनांचा लाभ गरजूंना मिळावा म्हणून सर्व योजनांचा शुभारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रमांचे प्रास्ताविक किसन जाधव यांनी केले. कार्यक्रम घेण्याचा उद्देश सांगताना अजित दादा यांच्या सूचनेप्रमाणे वाढदिवसानिमित्त लोकंउपयोगी कार्यक्रम संस्थेच्या वतीने आयोजित केल्याचे सांगितले. व उपस्थित असलेल्या जनसमुदायास अजित दादा यांच्या कार्याची माहिती सांगितली व त्यांना अभिष्टचिंतन देताना सर्वांचे आशीर्वाद दादांच्या पाठीशी सदैव राहो अशी प्रार्थना जनतेसमोर केली.
उद्घाटक यशवंत माने म्हणाले, कैकाडी समाज हा ब्रिटिश काळात तारेच्या कुंपणामध्ये बंदिस्त होता. त्यांची दोन वेळेची हजेरी ब्रिटिश राजवटीत होती. या समाजास माजी गुन्हेगारी जमात म्हणून ओळखले जात होते. आज कैकाडी समाजातील तरुण मुलं व मुली एमपीएससी व यु पी एस सी यासारख्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवत आहेत ही कैकाडी समाजाची फार मोठी प्रगती आहे उपस्थित सर्व लोकांना या पाच विद्यार्थ्यांचे अनुकरण करून समाजाचे नाव लौकिक करावं असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषणामध्ये आमदार संजय मामा शिंदे यांनी आपले मनोगतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून किसन जाधव व नागेश गायकवाड हे पक्षाचे काम करत आहेत. हे दोघे युवक अध्यक्ष असताना पासून समाजकार्य करत आहेत येणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित दादा पवार गटाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणतील असा विश्वास व्यक्त केला.
सदर कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन चेतन गायकवाड यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी संतोष पवार, कबड्डी असोसिएशनचे मदन गायकवाड, अंबादास गायकवाड, संतोष जाधव, मरगु जाधव, Lsजाधव, प्रकाश जाधव , कार्याध्यक्ष लता ढेरे, मोनिका सरकार , शशिकला कस्पटे, अमीर शेख, खलील शेख, आनंद मुस्तारे, हेमंत चौधरी ,संतोष जाधव ,महेश निकंबे उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमोल जगताप, माऊली जरग, माणिक कांबळे, वसंत कांबळे, महादू राठोड ,ऋषिकेश येवले, राजु जाधव, हुलगपा शासंम, ढेरे, लला कांबळे, आकाश जाधव, संतोष ऋतिक गायकवाड, सचिन पवार, उमेश जाधव साहेब, संतोष लोंढे यांनी परिश्रम घेतले.