सोलापूर : केवळ पंधरा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या एका २५ वर्षीय परिचारिकेने भुलीचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडगाव येथे शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
विशालक्ष्मी इरण्णा स्वामी वय २५ रा. वडगाव ता. दक्षिण सोलापूर असे मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. ती सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करीत होती. तिचा विवाह दोन आठवड्यापूर्वी झाला होता.
शनिवारी सायंकाळच्या सुमारास तिने घरात असताना स्वतः हाताला इंजेक्शन घेतली होती. त्यामुळे ती घरात झोपलेल्या अवस्थेत पडून होती, बराच झाले ती उठत का नाही म्हणून तिला बेशुद्धावस्थेत वडिलांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ती उपचारापूर्वीच मयत झाली. या घटनेची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली. हवालदार ज्योतिबा पवार हे तपास करीत आहेत.



















