17 मार्च 2021 रोजी मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलावलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जय हिंद शुगरचे युवा चेअरमन गणेश माने देशमुख यांनी भाजपचा नाद सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला 2019 च्या विधानसभा निवडणुकी वेळी गणेश माने देशमुख यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी कडून मुलाखत देत उमेदवारी मागितली होती मात्र त्यांना संधी मिळाली नाही.
विशेष म्हणजे पूर्वाश्रमीचे काँग्रेस तथा सध्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे जावई गणेश माने देशमुख होत. जयहिंद शुगरच्या माध्यमातून अक्कलकोट तसेच दक्षिण भागात सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांची चांगली ओळख आहे. शेतकऱ्यांमध्ये त्यांचे नाव आहे, आता गणेश माने देशमुख यांचे नाव दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघासाठी येऊ लागलं होत त्या पद्धतीने माने देशमुख यांनी कामकाज करायला सुरुवात केल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली. त्यांनी काँग्रेस भवनात येऊन शहराध्यक्ष आणि माजी जिल्हाध्यक्ष यांची भेट घेतली त्यावेळी स्वागत व सत्कार झाले.
काँग्रेस प्रवेश केल्यानंतर केवळ पाच दिवसात माने देशमुख यांनी काँग्रेस भवनात येऊन सर्व माहिती घेतली स्थानिक राजकारणात ते सक्रिय होण्याच्या मार्गावर होते, विशेष म्हणजे त्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांशी आपल्या विजापूर रोड वरील शनाया हॉटेल वर बोलावून चर्चा केली, काँग्रेसच्या आमदार तथा प्रदेश कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची भूमिका दर्शवली होती, नंतर कोरोनाचा दुसरा लॉकडाऊन लागला त्यामुळे माने-देशमुख कुठे गायब झाले परत पक्षाच्या कार्यक्रमात दिसले नाहीत.
जिल्हाध्यक्ष पदी डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी पदभार घेतला, त्यांचे जिल्हा दौरे सुरू होत आहेत, मोहिते पाटलांनी 15 सप्टेंबर रोजी पहिली बैठक दक्षिण तालुक्याची लावली आहे, त्या बैठकीला सिद्धाराम म्हेत्रे, सुरेश हसापुरे, हरीश पाटील, बळोरगी शेळके, जमादार, सातपुते, बगले, गायकवाड, राठोड, आचलारे, नरोळे यांची नावे आहेत मात्र गणेश माने-देशमुख यांच्या नावाचा उल्लेख दिसत नाही, त्यामुळे माने-देशमुख यांनी काँग्रेसचा पण नाद सोडला का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.



















