सोलापूर : काँग्रेस पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी माजी आमदार रामहरी रुपनवर उपस्थित होते, यावेळी पत्रकारांनी काँग्रेस पक्षाने आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा नारा दिला आहे, मात्र सोलापूर जिल्ह्यातील सर्वच पक्षाची अवस्था पाहता काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने एकत्र येऊन निवडणुका लढवाव्या का असा प्रश्न केला असता धवलसिंह मोहिते-पाटील आणि रामहरी रुपनवर यांनी आम्हाला जिल्ह्यात काँग्रेस पक्ष मजबूत करायचा आहे त्यामुळे आगामी सर्व निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर लढवण्याचे नियोजन असल्याचे सांगताना आपल्या स्वबळाचा नारा दिला पहा काय म्हणाले हे नेते



















