सोलापूर : राज्यामध्ये भाजप व शिवसेनेचे सरकार आल्यानंतर मागील एक वर्षभर सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झाले नव्हते. तो मान तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना मिळाला होता. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस ही सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर राज्यातील 28 जिल्ह्यांमध्ये देशाच्या स्वातंत्र्यदिनी प्रत्येक शासकीय ध्वजारोहण करण्यासाठी नेत्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्हा हा मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आलेला आहे. उर्वरित सात जिल्ह्यांमध्ये मात्र जिल्हाधिकाऱ्यांना तो मान देण्यात आला आहे.