सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य वित्त व लेखा अधिकारी उत्तम सुर्वे यांची प्रमोशन वर बदली झाली आहे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त लेखा अधिकारी पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील 55 अधिकाऱ्यांच्या सहाय्यक संचालक पदावरून उपसंचालक पदावर पदोन्नती दिली आहे. त्यामध्ये सोलापूर झेडपीचे उत्तम सुर्वे यांचा समावेश आहे. सोलापूर जिल्हा परिषदेला मात्र अधिकारी देण्यात आलेला नाही. आता हा पदभार कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तत्कालीन मुख्य वित्त अधिकारी अजय सिंह पवार यांचे प्रमोशन पर बदली झाल्यानंतर त्यांचा पदभार उत्तम सुर्वे यांच्याकडे होता मागील अनेक महिन्यापासून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने जिल्हा परिषदेमध्ये कामकाज केले आहे.